थिम पार्क


 

  • सेंट्रल पार्क (Central Park) :- बाळकुम - कोलशेत रोड येथील २२ एकर जागेवर विकसित करण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कचे अंदाजे ६ एकर जागेचे विकसिकरण करण्यात आले असून उर्वरित उद्यान विकसिकरणाचे काम सुरु आहे.

 

  • कम्युनिटी पार्क (Community Park) :- पोखरण नं २ येथील १.५ एकर क्षेत्रफळावर विकसित करण्यात येणाऱ्या कम्युनिटी पार्कचे अंदाजे १ एकर जागेचे विकसिकर करण्यात आले असून उर्वरित उद्यान विकसिकरणाचे काम सुरु आहे.

 

  • नॉर्दन पार्क (Northern Park) :- ब्रह्माण्ड परिसरालगत ३० एकर क्षेत्रफळापैकी अंदाजे ६ एकर जागेचे विकसिकरण करण्यात आले असून उर्वरित उद्यान विकसिकरणाचे काम सुरु केले आहे .

 

  • बॉलीवूड पार्क (Bollywood Park) :- वर्तकनगर प्रभाग कै.अप्पासाहेब पवार उद्यानामध्ये १.४८ एकरजागेत बॉलीवूड पार्क विकसित करण्यात येत असून त्यापैकी ३५% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरु आहे.

 

  • जुने ठाणे नवीन ठाणे थीम पार्क (Old Thane Park) :- मौजे - चितलसर मानपाडा ,घोडबंदर रोड येथून जुने ठाणे नवीन ठाणे शहराची प्रतिकृती संकल्पनेवर १ एकर जागेचे विकसन करण्याचे नियोजन होते . सदर उद्यानाचे ३५% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरु आहे .

 

  • ट्राफिक पार्क (Traffic Park) :- अर्बन फॉरेस्ट या संकल्पनेच्या आधारावर कावेरस येथे ८ एकर सुविधा भूखंडावर सेक्टर -३ मध्ये अमृत योजना ,महापालिका निधी व प्रायोजकांमार्फत पार्कचे विकसिकरण करण्यात येत असून ५ एकर जागेवर ५० विविध प्रजातीचा ३५०० वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.

  • जैव विविधता उद्यान (Biodiversity Park) :- कासारवडवली येथील उद्यानामध्ये १ एकर जागेवर जैव विविधता उद्यान विकसिकरणाचे काम सुरु आहे.