धोरण आणि उद्दिष्टे


धोरण आणि उद्दिष्टे

 
१) झाडांचे संरक्षण व जतन : ठाणे महानगरपालिका अधिकारितेतील सर्व जमिनींवरील सर्व झाडांचे संरक्षण व जतन करणे.
 
२) वृक्षारोपण : ठाणे महानगरपालिका हद्दीतील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दूष्टीने वृक्षारोपण करणे.
 
३) वृक्ष गणना : ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व जमिनींवरील विद्यमान झाडांची गणना करणे.
 
४) प्रत्यारोपण : नवीन रस्ते बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेले रस्ते रुंद करण्यासाठी किंवा जिवीत वा मालमत्ता यांना असलेल्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी दुसऱ्या जागी लावणे आवश्यक झालेल्या शक्य त्या झाडांचे प्रत्यारोपण करणे.
 
५) प्रदर्शन : फुले, फळे, भाज्या, झाडे किंवा रोपे यांची प्रदर्शने आयोजित करणे आणि अशी प्रदर्शने आयोजित करण्यासाठी खाजगी व सार्वजनिक संस्थाना साहाय्य करणे आणि झाडे व वनस्पती यांचे मानवी जीवनात जे महत्वाचे स्थान आहे त्याबद्दल लोकमत तयार करणे.
 
६) सल्ला व तांत्रिक सहाय्य : झाडे लावणे, त्यांचे संरक्षण व जतन यांच्याशी संबंधित कोणत्याही बाबीत ज्याला सल्ला वा सहाय्य हवे असेल अशा कोणत्याही व्यक्तीला सल्ला वा तांत्रिक सहाय्य देणे.